Ad will apear here
Next
एकमेकां साह्य करू, अवघे होऊ श्रीमंत...
‘सॅटर्डे क्लब’मध्ये झालेल्या मराठी उद्योजकांच्या ‘टॉक शो’मधून उलगडले यशाचे गमक
पुणे : पुण्यातील ‘सॅटर्डे क्लब’ आणि ‘दे-आसरा’ फाउंडेशनच्या वतीने नुकतेच उद्योजकांच्या टॉक शोचे आयोजन करण्यात आले होते. ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर, ‘येवले-अमृततुल्य’ चहाचे नवनाथ येवले आणि ‘शारंगधर फार्मास्युटिकल्स’चे जयंत अभ्यंकर हे तीन उद्योजक या ‘टॉक शो’मध्ये सहभागी झाले होते. आपल्या व्यवसायातील यशाचे गमक सांगतानाच या उद्योजकांनी व्यावसायिकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. 

मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सॅटर्डे क्लब’ या ग्लोबल मराठी ट्रस्टतर्फे क्लबच्या सदस्यांसाठी आणि इतर व्यावसायिकांसाठी या तीन उद्योजकांच्या टॉक शोचे आयोजन करण्यात आले होते. क्लबच्या प्रतिज्ञेने आणि क्लबच्या सदस्या गायत्री अकोलकर यांनी सादर केलेल्या गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ‘सॅटर्डे क्लब’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त अशोक दुगाडे, दे-आसरा फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा गोडबोले, क्लबचे प्रादेशिक सचिव अभिजित फडणीस, सुहास फडणीस, मांजरेकर आणि स्वप्नील कुलकर्णी यांनी दीपप्रज्ज्वलन केले. 

‘सॅटर्डे क्लब’ आणि ‘दे-आसरा फाउंडेशन’ यांच्यातील एकत्रित कार्याचा करार या वेळी करण्यात आला. मान्यवरांच्या स्वागतानंतर ‘दे-आसरा फाउंडेशन’च्या प्रज्ञा गोडबोले यांनी संस्थेबद्दल माहिती दिली. ‘नवीन उद्योजकांना उद्योग उभारणीमध्ये मदत करणारी ‘दे-आसरा फाउंडेशन’ ही सामाजिक संस्था चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. ‘पर्सिस्टंट’ कंपनीचे आनंद देशपांडे आणि त्यांच्या कुटुंबामार्फत ही संस्था चालवली जाते. उद्योगासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती संस्थेतर्फे दिली जाते. याशिवाय विविध प्रकारच्या संबंधित सेवाही पुरवल्या जातात,’ अशी माहिती गोडबोले यांनी दिली. 

यानंतर ‘सॅटर्डे क्लब’चे स्वप्नील कुलकर्णी यांनी क्लबच्या स्थापनेपासून आजवरच्या वाटचालीचा आढावा सादर केला. ‘सॅटर्डे क्लब ही एक स्वयंसेवी संस्था आहे. ‘एकमेकां साह्य करू, अवघे होऊ श्रीमंत’ हे ब्रीदवाक्य घेऊन मराठी उद्योजकांच्या एकत्रिकरणासाठी हा क्लब कार्यरत आहे. आज भारताबरोबरच देशाबाहेरही या क्लबच्या शाखा चालवल्या जातात,’ अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. या वेळी क्लबमार्फत पुणे विभागासाठी घेण्यात येणार असलेल्या ‘उद्योगदिंडी’ या आगामी कार्यक्रमाबद्दलची माहितीही देण्यात आली. 

कार्यक्रमाचे प्रायोजक असलेल्या ‘माय वीकेंड टूर्स’च्या वेबसाइटचे या वेळी उद्घाटन करण्यात आले. ‘माय वीकेंड’चे मनीष केळकर यांनी याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘सॅटर्डे क्लब’च्या वैशाली वर्णेकर यांनी केले. क्लबचे अभिजित फडणीस यांनी आभार मानले. 

उद्योजकांच्या ‘टॉक शो’मध्ये वैशाली वर्णेकर यांनी व्यवसायवृद्धी या विषयाच्या अनुषंगाने तिन्ही उद्योजकांना प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी दिलेली उत्तरे ही नव्या व्यावसायिकांसाठी एक वस्तुपाठच आहेत.

जयंत अभ्यंकरव्यवसाय म्हणजे विज्ञान, वाणिज्य आणि कला यांचे संयोजन.. : जयंत अभ्यंकर
ब्रँड हा शब्द आता इतका मोठा झाला आहे, की एखाद्या उद्योगाचे ‘वन लायनर इक्वेशन’ म्हणजे ब्रँड असं म्हणता येईल. फार्मसी क्षेत्रात व्यवसाय करत असताना माझ्या लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे, व्यवसाय हे विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही घटकांचे कॉम्बिनेशन असते. माझे आई-वडील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते. माझे क्षेत्र वेगळे असूनही फार्मसी क्षेत्रात व्यवसाय करण्याची इच्छा मी दर्शवली. आयुर्वेदिक औषधांचा ब्रँड तयार करून त्याचा व्यवसाय करण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्यात अभ्यास करून ‘शारंगधर’ या आयुर्वेदातील नावानेच हा व्यवसाय सुरू केला. नियोजन, अभ्यास आणि चिकाटी यांमुळे व्यवसायात यश मिळू शकले आणि आमचा एक प्रसिद्ध ब्रँड तयार होण्यात मदत झाली.

मंदार जोगळेकरप्रत्येक गोष्टीत व्यवसाय दिसला पाहिजे : मंदार जोगळेकर
तुमचा व्यवसाय तुम्ही तुमच्याशिवाय चालवू शकत असाल, तरच तो व्यवसाय तुम्ही यशस्वीपणे करू शकत आहात, असा व्यवसायाचा एक प्राथमिक नियम आहे. यामुळे विचार करण्यासाठी आणि वाचनासाठी माझा जास्तीत जास्त वेळ मी देतो. याच विचारप्रक्रियेतून मला प्रत्येक गोष्टीत व्यवसाय सापडतो. व्यवसायाच्या बाबतीत स्टीव्ह जॉब्स हे माझे गुरू आहेत. त्यांनी अवलंबलेल्या अनेक गोष्टी मी जवळून अभ्यासल्या आहेत आणि त्यातून माझ्या अनेक गोष्टींमध्ये मी यश मिळवू शकलो आहे.

 अकरावी-बारावी विज्ञान शाखेत शिकून वैद्यकीय अभ्यासक्रमाला जाण्याचा विचार होता. परंतु पुढे अर्थशास्त्र विषयात पदवी आणि पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून मी सॉफ्टवेअरचे काही अभ्यासक्रम केले आणि त्या बळावर पुढे स्वतःचा सॉफ्टवेअरमधील व्यवसाय सुरू केला. कालांतराने हे काम घेऊन अमेरिकेत स्थायिक झालो. तिथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला जाण्याचा योग आला. मराठी पुस्तके जगभर पोहोचवण्यासाठी तुम्ही तरुण काहीच प्रयत्न का करत नाही, असा प्रश्न तिथे एका साहित्यिकाने मला केला. त्या वेळी मी त्यांना आश्वासन दिले, की मी या क्षेत्रात काहीतरी करून दाखवीन. यातून मग ‘बुकगंगा’ची सुरुवात केली. आज ‘बुकगंगा’तर्फे आणि ‘मायविश्व’ या माझ्या कंपनीतर्फे विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. 

नवनाथ येवलेआपला एक ब्रँड तयार करणे हेच उद्दिष्ट होते : नवनाथ येवले
आधी बराच काळ मी हॉटेलवर काम केले होते. त्यामुळे सगळ्याच कामांची सवय होती. नंतर आपला एक विशेष ब्रँड असला पाहिजे असे ठरवले. त्यानुसार ‘येवले-अमृततुल्य’ चहाचा आमचा विशेष ब्रँड प्रस्थापित केला. त्यावर आधी बरेच काम केले. त्याचे प्रमाण निश्चित करणे, आज असलेल्या सर्व १५० शाखांमध्ये ते प्रमाण सारखे राहील याची काळजी घेणे, प्रत्येक शाखेत बसवलेले सीसीटीव्ही आणि आमच्या विशेष सहकाऱ्यांमार्फत ‘स्टँडर्डस्’चे नियोजन करणे या सगळ्या गोष्टी व्यवस्था लावून नियंत्रित केल्या जातात. एखादी गोष्ट आपल्याकडे न मिळणे, हीदेखील मार्केटिंगची एक युक्ती ठरू शकते. 

येवले चहा या संकल्पनेवर सात ते आठ वर्षे काम करून त्यानंतर तो सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला. १९८५मध्ये माझे काका चालवत असलेल्या हॉटेलमधला चहा खूप प्रसिद्ध होता हे समजले. यातून मग ‘चहा’ हाच आपला एक ब्रँड तयार करायचा असे ठरले. सर्वसामान्य माणसाचे पेय असलेल्या चहावर आम्ही २०११मध्ये काम सुरू केले आणि जून २०१७मध्ये आमचा ‘येवले-अमृततुल्य’ चहा सुरू झाला. आधी भेळेचा एक गाडा घेऊन त्यावर चहाविक्री सुरू केली. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून मग आउटलेट सुरू केले. पुण्यात मंडईजवळ घेतलेल्या पहिल्या आउटलेटला जवळपास सव्वा लाख भाडे होते. परंतु तरीही धोका पत्करून हे काम यशस्वी करण्याचे ठरवले आणि त्यात यश मिळत गेले. आज शहरात येवले चहाच्या जवळपास १५० शाखा आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZXECD
Similar Posts
अष्टावक्र-नाथगीता पुस्तक आणि ई-बुकचे प्रकाशन पुणे : सिद्ध चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात अष्टावक्र-नाथगीता या पुस्तकाचे, तसेच ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. वृषाली पटवर्धन यांनी हे पुस्तक लिहिले असून, आरंभ प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे. ‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे
ये हौसला कैसे झुके, ये आरजू कैसे रुके... रत्नागिरी जिल्ह्यातल्या साखरप्यासारख्या लहानशा गावातून एक मुलगा पुण्यात पोहोचला आणि नंतर त्याच्या स्वप्नांनी त्याला थेट अमेरिकेत नेऊन पोहोचवलं. अमेरिकेत जाऊनही त्यानं आपलं मूळ गाव साखरपा आणि पुणे यांच्याशी असलेली नाळ तोडली नाही. या तरुणाचं नाव आहे मंदार मोरेश्वर जोगळेकर! ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदराच्या
‘सायलीची वाटचाल थक्क करणारी’ पुणे : ‘डाउन सिंड्रोमवर मात करून, नृत्यासारखी कठीण कला आत्मसात करून आत्मविश्वासाने सर्वांसमोर सादर करणारी, सायली नुसतीच ‘अमेझिंग चाइल्ड’ नाही, तर ‘एक्स्ट्रा ऑर्डिनरी अमेझिंग चाइल्ड’ आहे. तिच्या प्रतिभेने मी थक्क झालो आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी सायली अगावणे हिचे कौतुक केले.
‘आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडिया करील पुस्तक व्यवसायाची भरभराट’ पुणे : ‘मराठी वाचक कमी झाला आहे अशी ओरड केली जाते पण तसे मुळीच नाही. उलट, वितरण व्यवस्था पुरेशी नसल्याने पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचत नाहीत. पुस्तके गावोगावी पोहोचण्यासाठी प्रकाशकांनी ऑनलाइन विक्रीची सेवा देणाऱ्या व्यवस्थेचा आधार घ्यावा,’ अशी सल्लावजा सूचना राज्याचे शिक्षणमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language